पोर्नोग्राफीची 'हौस', कमी करे बेडरूममधील 'मौज'!

ऑनलाइन असल्यावर तुम्हांला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल तर ती आजचं बंद करा. ऑनलाइनवर पोर्नोग्राफीचा आस्वाद घेणारे वैवाहिक पुरूषांचा बेडरूममधील परफॉर्मन्स हा अगदीच ढिसाळ असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Updated: Jan 17, 2012, 06:50 PM IST

www.24taas.com, लंडन

ऑनलाइन असल्यावर तुम्हांला पोर्नोग्राफी पाहण्याची सवय असेल तर ती आजचं बंद करा. ऑनलाइनवर पोर्नोग्राफीचा आस्वाद घेणारे वैवाहिक पुरूषांचा बेडरूममधील परफॉर्मन्स हा अगदीच ढिसाळ असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

लंडनच्या डेली मेलने केलेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती नियमीत पोर्नोग्राफीकल चित्र किंवा व्हिडिओ पाहतात, ते बेडरूममध्ये सेक्शुअल इंटरकोर्स करताना चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही.

 

पॉर्न- सेक्सुअल इंटरकोर्स करण्यात मोठा अडथळा या नावाचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यात पोर्नोग्राफिकल साहित्य वाचले किंवा पाहिले तर त्याचा विपरीत परिणाम कामोत्तेजनावर होतो. यात ३० वर्षांच्या वरील व्यक्तींवर अधिक परिणाम होतो. अशा व्यक्तींनी बेडमध्ये आपल्या साथीदाराला सुख देण्यास असमर्थ ठरू शकतात.

या वेगळ्या प्रकारच्या आजारात आपला मेंदू सेक्स संदर्भातील आपल्या भावनांना प्रतिसाद देत नाही. कारण आपण चित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अधिक प्रमाणात सेक्स संबंधी विचार करतो. आपल्या मेंदू याची सवय होते. त्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स करताना नाविण्याची अनुभूती राहत नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

 

यापूर्वी पोर्नोग्राफीकल साहित्यांचा प्रसार फार थोड्या प्रमाणात झाला होता. मात्र, आता इंटरनेटच्या प्रसारामुळे पोर्नोग्राफीकल साहित्य सहज उपल्बध होते. त्याचा परिणाम अशा प्रकारांच्या आजारात होतो, असे हा अहवाल करणारे मार्निया रॉबिन्सन यांनी सांगितले आहे.