Maharashtra Weather Update in Marathi : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असून राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/WRljRk7gXi— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
राज्यासह देशात उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे. (maharashtra weather update unseasonal rain till 18 may orange alert in pune satara chandrapur)
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/ebrhtAqCsj— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कोसळलं असून आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12 ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/VQhi1CoGm7— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील व संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २७°C च्या आसपास असेल. pic.twitter.com/RLcCErKAgB— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
मे महिन्या उजाडला असल्याने मुंबईतील वातावरण कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजनुसार शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ असणार आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 27°C च्या आसपास असेल.