Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!

Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य

नेहा चौधरी | Updated: May 12, 2024, 06:50 AM IST
Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार! title=
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya in marathi 12 may 2024

Horoscope 12 May 2024 in Marathi : वर्षाचा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. आयुष्यात अनेक उतार चढावर येत असतात. रविवार हा सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस. त्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शनिदेव नक्षत्र बदल करणार आहे. अशा स्थिती आजचा तुमचा रविवार एकंदरीत कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

आज महागड्या वस्तूंची खरेदी करु शकता. आज तुम्हाला स्वयंपाकघरात स्वादिष्ट पदार्थ बनणार आहेत. अपेक्षित कामात विलंब झाल्याने मन थोडे उदास असणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असल्याने चांगल वाटेल. 

वृषभ (Taurus Zodiac) 

आज नशीब तुम्हाला साथ देणार आहे. कोर्ट आणि कोर्ट केसेसपासून दूर राहणं तुमच्या हिताच ठरले. व्यवसायात लाभ होणार आहे. पैसे मिळणे तुम्हाला सोपे जाणार आहे. घरगुती वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी आपले संबंध मजबूत ठेवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. 

मिथुन (Gemini Zodiac)

आज कोणाशीही विनाकारण वाद करु नका. व्यवसायात आज मोठा फायदा होणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळणार आहे. व्यवसायात लाभदायक परिस्थिती असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

आज तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. पार्टीला जाण्याचा बेत आखणार आहात. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला असणार आहे. यश तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायात लाभदायक गोष्टी घडणार आहेत. नोकरीत चांगली कामगिरी करणार आहात.

सिंह (Leo Zodiac) 

आज जुने शत्रू तुमचे तुमच नुकसान करणार आहेत. तुमच्या बोलण्यातून तुम्ही एखाद्याला दुखवणार आहात. त्यामुळे वाणीवर आणि रागावर संयम ठेवा. शारीरिक त्रास होणार आहे. कामात निष्काळजीपणा करु नका. आजचा दिवस आरामात जाणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)   

आज तुम्ही घरातील सदस्यांसोबत वेळ व्यतित करणार आहात. वाईट लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्याची रणनिती ठरवणार आहेत. निष्काळजीपणामुळे तुमचं काम बिघण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्या कामाचे नक्कीच कौतुक होणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

आज तुम्हाला शारीरिक विश्रांतीची गरज असणार आहे. दूरवरून काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. जोखीम पत्करण्याचे काम तुम्ही सहज करु शकणार आहात. नोकरीत सहकाऱ्यांकडून प्रशंसा होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

रविवार सुट्टी असल्याने तुम्ही आज आळशी राहणार आहात. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आज तुम्हाला काही मोठ्या समस्येतून आराम मिळणार आहे. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळणार आहेत. आज सट्टेबाजी आणि लॉटरीपासून दूर राहणं हिताच ठरेल. 

धनु (Sagittarius Zodiac) 

आज तुम्ही काही मोठे काम करण्यात यशस्वी होणार आहात. तुमचे मन उपासनेत गुंतलेले राहणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. कायदेशीर अडथळे दूर होऊन लाभ मिळणार आहे. दिवस सामान्य असणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

लोकांचे मन दुखेल असे कोणतेही काम करु नका. तुमच्या व्यावसायिक प्रवासात तुम्हाला यश मिळणार आहे. थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार आहे. तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करण्याचा प्रयत्न नक्की करा. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac) 

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. कामकाजाची व्यवस्था सुधारण्याची गरज असणार आहे. स्त्री पक्षाकडून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या मदतीने आज तुमचं काम मार्गी लागणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

आज व्यवहारात सावध राहणे हिताच ठरेल. आज तुमचा अनपेक्षित खर्च होणार आहे. जुनाट आजारामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीतील अधिकारी तुम्हाला त्रासदायक ठरेल. इतरांच्या कामात जास्त रस न दाखवणे चांगल होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)