तेव्हा स्त्रियांकडून सेक्सचा जास्त विचार

www.24taas.com, लंडन महिलांच्या शरिरात मासिक पाळीच्या काळात अंडाशय परिपक्व होते त्या काळात सेक्सच्या बाबतीत त्या जास्त कल्पना करतात असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

Updated: Mar 26, 2012, 07:47 PM IST

 www.24taas.com, लंडन

 

महिलांच्या शरिरात मासिक पाळीच्या काळात अंडाशय परिपक्व होते त्या काळात सेक्सच्या बाबतीत त्या जास्त कल्पना करतात असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

 

लेथब्रिज विश्वविद्यालयाच्या संशोधकांना हे आढळून आलं आहे की एकट्या राहणाऱ्या स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान जेंव्हा परिपक्व होतं त्या दिवसात इतर दिवसांच्या तुलनेत त्या सेक्सच्या बाबतीत जास्त कल्पना करतात.

 

संशोधकांनी या अभ्यासासाठी १८ ते ३० वर्षा दरम्यान २७ स्त्रियांचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांना आढळून आलं की गर्भ निरोधासाठी त्या कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल औषधांचे सेवन करत नव्हत्या तसंच त्यांचे कोणत्याही व्यक्तीशी प्रेम संबंधही नव्हते.

सर्व स्त्रियांना एक महिन्यापर्यंत रोज सेक्सच्या बाबतीत आपल्या कल्पना लिहून काढायच्या होत्या. एक महिन्यानंतर या स्त्रियांनी लिहिलेल्या डायरीच्या अभ्यासाअंती असं आढळून आलं की मासिक पाळीच्या दरम्यान अंडाशय परिपक्व होतं त्या काळात स्त्रिया सर्वात जास्त सेक्सच्या कल्पनांमध्ये रममाण होतात.