लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना वाटतात 'हॉट'

लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात. हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही झालं आहे.फ्रांसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे.

Updated: Apr 24, 2012, 04:35 PM IST

www.24taas.com, पॅरीस

 

लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या पुरूषांना अधिक पसंत पडतात. हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही झालं आहे.फ्रांसमधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की, लाल कपड्यांतील स्त्रिया पुरूषांना अधिक आकर्षक वाटतात. यासाठी त्यांनी एक प्रयोग केला.

 

१८ ते २१ वयोगटातील १२० पुरुषांना त्यांनी चार ग्रुपमध्ये विभागलं. प्रत्येकाला विविध रंगाच्या कपड्यातील तरुणींचे फोटो ३० सेकंद दाखवले. प्रत्येक ग्रुपमधील मुलांनी लाल कपड्यातील मुलीच्याच फोटोला पसंती दिली. इतर रंगाचे कपडे घातलेल्या मुलींचे फोटो आकर्षक असूनही त्यांना लाल कपड्यातील ललनाच मनमोहक वाटली. लाल कपड्यातील तरुणी सहज आपल्याबरोबर शय्यासोबतीला तयार होतील, असं पुरुषांना वाटतं.

 

यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत आपल्याला लाल कपड्यातील स्त्रियांशी सेक्स करायला आवडेल असं उत्तर दिलं होतं. याचा मानसशास्त्रीय वेध घेताना लक्षात आलं की लाल रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया या अधिक आकर्षक दिसतात. या कपड्यातील स्त्रियांकडे पाहून कामवासना जागृत होते. कारण, लाल रंग हाच मुळात आक्रमकतेचं प्रतिक आहे. हा रंग सेक्समधील वासना, रोमांस आणि प्रजनन या गोष्टींशी संबंधित आहे, त्यामुळे या कपड्यातील स्त्रिया अधिक आकर्षक वाटतात. त्यामुळे कामवासना जागृत करण्यासाठीही लाल रंग प्रभावी ठरतो.