शिष्णातील ताठरता कमी झाल्यास दुर्लक्ष करु नका

मधुमेहामुळे शिष्णातील ताठरतेवर परिणाम होते आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार उदभवू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

Updated: Feb 10, 2012, 08:07 PM IST

www.24taas.com, वॉशिंगटन

 

मधुमेहामुळे शिष्णातील ताठरतेवर परिणाम होते आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार उदभवू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे. अनेक पुरुषांच्या लक्षात येत नाही की शिष्णातील ताठरता ही भविष्यातील हदयरोगाचे लक्षण असल्याचा धोक्याचा इशारा असतो असं हाऊस्टनच्या द मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे डॉ.टिमोथी बून यांनी म्हटलं आहे.

 

जसा वॅलँटाईन दिवस जवळ येतो तेंव्हा अनेक पुरुषांना आपल्या पौरुषत्वाबद्दल चिंता सतावते पण त्यांनी खरी काळजी केली पाहिजे ते आजाराची प्रक्रिया नियंत्रणात कशी आणता येईल त्याची. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये नसा ताठरण्याची जोखीम अधिक असते. हृदयाला पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांच्या स्थिती नाजूक झाल्यामुळे ही शक्यता अधिक असते.

 

पूर्वी शिष्णातील ताठर होण्याच्या ९० टक्के केसेसमध्ये मानसिक कारण तर दहा टक्के केसेसमध्ये शारिरीक कारण असायचं. आता त्या उलट परिस्थिती आहे. जगभरातील मधुमेह असणाऱ्या ८० टक्के पुरुषांमध्ये शिष्णातील ताठरता कमी होते आणि मधुमेह नसणाऱ्यांचे प्रमाण फक्त २५ टक्के आहे. शिष्णातील ताठरता वयाच्या ६५ व्या वर्षानंतर कमी होते पण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींपैकी हीच स्थिती दहा ते पंधरा वर्षे आधी उदभवते.

 

जगभरातील ४० ते ७० टक्के वयोगटातील ३०० दशलक्ष पुरुषांना शिष्णातील ताठरता कमी झाल्याच्या परिस्थितील  तोंड द्यावं लागत आहे. टीव्हीवर जोम, पौरुष किंवा मर्दानी ताकद वाढवणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना बळी पडू नका असा इशारा डॉ.बून यांनी दिला आहे. यावर उपायासाठी युरोलॉजिस्तचा सल्ला घेणं योग्य असल्याचं मत डॉ बून यांनी व्यक्त केला आहे. रुग्णाची मेडिकल हिस्टरी आणि टेस्टोटेरोनची पातळी तपासून योग्य औषधोपाचार केल्यास सुधारणा होऊ शकते. मात्र दुर्लक्ष केल्यास अधिक गंभीर आजार उदभण्याचा धोका संभवू शकतो.