वैज्ञानिकाच्या मते, ज्या पुरूषामध्ये महिलांप्रमाणे अतिरिक्त हार्मोन्स आढळतात, त्या पुरूषांची सेक्सची भूक अत्यंत तीव्र असते, त्यामुळे त्यांची सेक्सची भूक भागवणं देखील मुश्किल असतं. वैज्ञानिकांच्या मते, उंदरांमध्ये ही गोष्ट जवळजवळ १०० टक्के आढळते.
हार्मोन्स डीएनएच्या एका लांब तारेनुसार असतात ज्यात अनेक जीनचा समावेश असतो. मानवी शरीरात २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आणि या प्रत्येक गुणसुत्रांच्या जोड्या ह्या वंशपंरपरेनुसार मिळत असतात.
महिलांमध्ये दोन 'एक्स' गुणसूत्र असतात. तर पुरषांमध्ये एक 'एक्स' आणि एक 'वाय' गुणसूत्र आहे. 'हार्मोन्स एंड बिहेवियर' या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात उंदरांवर केल्या गेलेल्या प्रयोगावर संशोधकाचं असं म्हणणं आहे की, ज्या पुरूषांमध्ये एक्स गुणसूत्रांची जोडी जास्त असल्यास त्यांचा सेक्सविषयी भावना या अत्यंत तीव्र असतात. त्यामुळे या सेक्सच्या तीव्र भावनेमुळे काही पूरूष इतरांपेक्षा जास्तच सेक्सच्या आधीन असतात.