२८व्या वर्षी करतात स्त्रिया 'बेस्ट सेक्स'

स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील सर्वेत्कृष्ट संभोग वयाच्या २८व्या वर्षी करत असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. पण, पुरूषांना मात्र या पायरीवर पोहोचेपर्यंत वयाची तिशी पार करावी लागते. पुरूष तेहतिसाव्या वर्षी सर्वेत्कृष्ट सेक्स करतात.

Updated: Jun 1, 2012, 10:50 PM IST

www.24taas.com, लंडन

 

स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील सर्वेात्कृष्ट संभोग वयाच्या २८व्या वर्षी करत असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. पण, पुरूषांना मात्र या पायरीवर पोहोचेपर्यंत वयाची तिशी पार करावी लागते. पुरूष तेहतिसाव्या वर्षी सर्वेात्कृष्ट सेक्स करतात.

 

या सर्वेक्षणात हे ही लक्षात आलं की बहुतेक स्त्रिया वयाच्या १७व्या वर्षीच आपलं कौमार्य गमावतात आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी सर्वांत जास्त सेक्स करतात. बहुतेक पुरूष साधारणतः वयाच्या १८ व्या वर्षी कौमार्यभंग करतात आणि २९ व्या वर्षी सर्वाधिक सेक्स करतात.

 

सेक्सची सर्वाधिक मजा तुम्ही कुठल्या वयात लुटता अशी एका पोलद्वारे विचारणा केली असता १२८१ लोकांपैकी ४०% लोक म्हणाले वयाच्या २८व्या वर्षी. तर, ५० ते ६० वयोगटातील लोकांना विचारलं असता त्यांनी वयाच्या ४६व्या वर्षी केला गेलेला सेक्स सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे.

 

मात्र प्रत्यक्ष परिणाम आणि सर्वेक्षणात खूप तफावत जाणवली. कारण, प्रत्यक्ष परिणामांमध्ये असं दिसून आलंय की पुरूष वयाच्या १८व्या वर्षी तर स्त्रिया ३०व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सेक्स करतात.  मात्र वयाच्या १७व्या वर्षीच आपला कौमार्यभंग करण्याचं महिलांमधील वाढतं प्रमाण हे चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.