या `हार्मोन`पासून झाले प्राणिजाती उत्क्रांत

माणसामध्ये टेस्टास्टेरॉन हे कामवासना जागृत करणारं `सेक्स हार्मोन` आहे. हे हार्मोन अतिप्राचीन असून, ते मणकेधारक प्राणिजातीपासून उत्क्रांत झालेलं आहे.

Updated: Apr 26, 2013, 08:16 AM IST

www.24taas.com
माणसामध्ये टेस्टास्टेरॉन हे कामवासना जागृत करणारं `सेक्स हार्मोन` आहे. हे हार्मोन अतिप्राचीन असून, ते मणकेधारक प्राणिजातीपासून उत्क्रांत झालेलं आहे. ते स्त्री व पुरुष दोघांमध्येही आहे. पुरुषांमध्ये ते स्त्रीपेक्षा २० ते ४० पटीने जास्त असतं.
अर्थात पुरुषाची कामेच्छा ही स्त्रीच्या तुलनेत तीव्र आणि तातडीची असते. पुरुषामध्ये शरीरसंबंधाची आतुरता असणे आणि त्याने त्याकरिता पुढाकार घेणे, हे टेस्टास्टेरॉन या रसायनांचे परिणाम असतात. याउलट स्त्रीची कामवासना सौम्य असते. तिच्यामध्ये टेस्टास्टेरॉनचं प्रमाण अल्प असतं.
लैंगिक उत्तेजित होण्यास टेस्टास्टेरॉनबरोबर इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसीन या हार्मोन्सचीसुद्धा गरज असते. पुरुषाच्या तीव्र कामवासनेतून स्त्रीवर लैंगिक हल्ले होऊ नयेत याची काळजी निसर्गाने स्त्री-पुरुष संबंध मुक्त ठेवून घेतलेली आहे.