मुंबई : लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?
अधिक वाचा : निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर
ज्यावेळी एखादे दाम्पत्य विवाह बंधनात अडकल्यानंतर समाज आणि घरच्यांच्या (सासरमंडळी) अनेक बंधने येतात. त्यांचे पालन करावे लागते. मात्र, हनीमूनवर गेलेल्या दाम्पत्याला एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो. कारण दोघांसाठी मोकळा वेळ मिळतो. रिलॅक्स होण्यासोबत एकमेकांबरोबर वेळ घालविल्याने दोघांमधील नातेसंबंध अधिक घट्ट होतात.
अधिक वाचा : सेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन
हनीमूनवर जाणे महत्वाचे आहे की, जो वेळ एकमेकांसोबत घालवला जातो. त्यातून दोघांच्यामध्ये आदराची भावना निर्माण होते. तसेच याशिवाय अनेक कारणेही समजून घेता येतात.
१. लग्नचा अर्थ धम्माल आणि मस्ती यांच्याशी आहे. मात्र, हनीमूनचा कालावधी हा आपल्या पार्टनरबाबत अधिक आदर निर्माण होतो. आयुष्यभर आपली साथ कायम राहील, असे दोघेही आश्वासन एकमेकांना देतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी ही वेळ एकदम महत्वाची आहे.
२. आपल्या व्यक्त कामातून आपल्या जीवनसाथीसाठी वेळ काढणे हे यामागचे चांगले कारण आहे. त्याच्यासोबत वेळ घालविणे ही चांगली कल्पना आहे. यामुळे पार्टनर शारीरिक आणि मानिक प्रेम अधिक वृद्धींगत होते. एकमेकांसोबत वेळ घालविल्याने दोघांना समजून घेण्यास अडचण येत नाही.
अधिक वाचा : रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स
३. ज्यावेळी आपण घरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवता. त्यांच्याकडेच पार्टनरपेक्षा अधिक लक्ष असते. मात्र, हनीमूनच्या वेळी तुम्ही दोघच असता, त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी, पसंती-नापसंती याबाबत जाणून घेता येतात.
४. लग्नानंकप प्रथमच आपण एकत्र कुठेतरी जात आहोत, ही आठवण आपण नेहमी जतन करुन ठेवता.
५. लग्नाच्यावेळी दोघेही थकलेले दमलेले असता. त्यामुळे ही थकवा दूर करण्यासाठी हनीमून एक चांगली कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश राहता आणि दोघांना अधिक जवळून जाणून घेता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.