मुंबई : ब्रिसबेनच्या आण्विक चिकित्सा केंद्राच्या अणू संशोधनकर्तांनी म्हटलं आहे, भारतात सर्वात जास्त प्रमाणात मेथीचं उत्पादन घेता येतं, मेथी पुरूषांच्या कामेच्छांमध्ये वाढ करण्यासाठी सक्षम आहे.
मेथी भारताच्या घरा-घरात मसाल्याचा पदार्थ म्हणून उपयोगात आणला जातो, आयुर्वेदानुसार मेथीमुळे सेक्स लाईफ चांगलं होतं. मेथीमध्ये एवढी क्षमता असतांनाही, आपण पश्चिमात्य उत्पादनांवर अवलंबून असतो.
पण आता याची गरज राहिलेली नाही, भारतीय मसाल्यांच्या बाबतीत परदेशी संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की, मेथीत सेक्स लाईफ सुधारण्याचे सर्वोत्कृष्ठ गुण आहेत.
संशोधकांच्या मते मेथीच्या बियांमध्ये सैपोनीन असतं, ते पुरूषांच्या टेस्टोस्टेरॉन हॉरमोनमध्ये उत्तजेना तयार करते. मात्र सावधानता बाळगण्याची देखील गरज आहे.
जास्त प्रमाणात मेथीचं सेवन केल्यास त्वचेला नुकसानही होऊ शकते, कारण मेथी हा गरम पदार्थ आहे.
भारतात कढी, आणि भाज्यांमध्ये मेथीचा वापर होतो, मेथीचं उत्पन्न प्रामुख्याने महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशात घेतलं जातं.
केस अधिक मुलायम, काळे आणि चकचकीत करण्यासाठी मेथीची पेस्ट बनवून केसांना लावली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.