सेक्स प्रति दाखविलेल्या कॅज्युल अप्रोचमुळे ब्रिटनमधील महिलांमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
गेल्या दोन दशकात सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे मॅचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अभ्यासातून शोधून काढले आहे. १९९२ ते २००६ दरम्यान ज्या महिलांचे वय २० वर्षे आहेत, अशांमध्ये महिलांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
१९९२ मध्ये २० ते २९ वयोगटातील एक लाख महिलांपैकी ५.५ टक्के महिलांना सर्व्हाइकल कॅन्सर झाल्याचे आढळले तर हे प्रमाण २००६ पर्यंत ७.९ पर्यंत वाढले आहे. आकडेवारीवर नजर टाकली असता याच वयोगटातील प्रमाण २१५ वरून २८३ वर वाढले आहे. तर दुसरीकडे इतर इतर वयोगटातील सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण कमी झाले आहे.
सर्व्हाइकल स्क्रिनिंग सुरू झाले तेव्हापासून या कर्क रोगाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, विशीत असलेल्या तरुणींमध्ये या रोगाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता या संदर्भात अभ्यास करणाऱ्या रॉबर्ट अल्टन यांनी सांगितले.
ब्रिटनमधील महिला सुरक्षित सेक्स करीत नसल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढले असल्याचेही मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.