निवडणुकीचा अचूक अंदाज सांगा, २१ लाख घेऊ जा!

 ज्योतिषांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कंबर कसली आहे. ज्योतिषांना आव्हान देत विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवल्यास, 21 लाख रुपयांचं बक्षिस देऊ, अशी घोषणा अंनिसने केली आहे.

Updated: Oct 11, 2014, 06:30 PM IST
निवडणुकीचा अचूक अंदाज सांगा, २१ लाख घेऊ जा!  title=

पुणे :  ज्योतिषांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कंबर कसली आहे. ज्योतिषांना आव्हान देत विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवल्यास, 21 लाख रुपयांचं बक्षिस देऊ, अशी घोषणा अंनिसने केली आहे.

ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली सामान्यांना ‘उल्लू’ बनविणाऱ्यांना अंनिसने हे आव्हान दिलं आहे. ज्योतिषी, ज्योतिषांची संस्था, मंडळे यांच्यापैकी कोणीही हे आव्हान स्वीकारू शकतात. भविष्य आणि ग्रहदशा यांच्या अभ्यासाने अचूक अंदाज वर्तवला जाऊ शकतो, असा दावा ज्योतिषांचा आहे.  या दाव्यांतील फोलपणा उघड करण्यासाठीच अंनिसने ही घोषणा केली.

कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल, मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, कोणाकडे कोणतं मंत्रिपद जाईल, या प्रश्नांची उत्तर ज्योतिषांनी देणं अपेक्षित आहे. हे आव्हान स्वीकारणाऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत सहभागाची संमती आणि पाच हजार रुपये अनामत रकमेचा डीडी समितीकडे पाठवण्याचे आवाहन समितीने केले आहे. 

विजेत्या ज्योतिषाला २१ लाख रुपयांची ठेव जमा पावती दिली जाणार आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या आधारे भाकित वर्तविणारे किती जण हे आव्हान स्वीकारतात हे येत्या १५ तारखेपर्यंत कळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.