नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र आहे.
कारण दिल्ली हायकोर्टाने अशोक चव्हाण यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस जारी केली आहे. कोर्टाने म्हटलंय निवडणूक आयोगाला नोटीस काढण्याचा अधिकार आहे.
अशोकपर्व नावाने वर्तमान पत्रात छापून आलेल्या पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाण यांना नोटीस जारी केली होती.
हे मागील प्रकरण विधानसभा निवडणुकीचं आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण नांदेडमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
अशोक चव्हाण सध्या यांच्या पत्नी अमिता चव्हाण भोकरमधून विधानसभा निवडणूक लढवित आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.