नागपूर: निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलफेक करणं आपल्याला माहित आहे. पण नागपूरच्या काटोल मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाला आहे. प्रमोद चाफळे असं या उमेदवाराचं नाव असून गोळीबारात चाफळे थोडक्यात बचावले आहेत.
चाफले हे गा़डीतून जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. यातून ते बचावले असून त्यांना कुठलीही इजा झालेली नसल्याचं सांगण्य़ात आलंय. दोन अज्ञात गोळीबार करून पसार झाले.
चाफळे यांना भाजपनं तिकीट नाकारल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. गोळीबार नक्की कुणी केला? हे समोर आलेलं नाही. गोळीबाराच्या तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक देशी कट्टाही सापडला आहे.
त्यामुळं चाफळे यांच्यावर नेमका कुणी गोळीबार केला? या गोळीबारामागे कोणाचा हात आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.