मुंबई: भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते विनोद तावडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं ही लढत त्यांच्यासाठी सोपी असली तरी विरोधकांकडून मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार म्हणून मुद्दा उपस्थित केला जातोय.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची चांगली पकड असलेल्या या मतदारसंघातून आता भाजप नेते विनोद तावडे आपले नशिब आजमावतायेत. इथं एक गठ्ठा गुजराती मतांची असलेली लक्षणीय संख्या ही भाजपसाठी जमेची बाजू राहिलीय. विनोद तावडेंमुळं आता मराठी मतंही त्यांच्याकडं वळू शकतात.
काँग्रेसनं इथून अशोक सुतराळे यांना मैदानात उतरवलं आहे. तर मनसेनं नयन कदम यांना उमेदवारी दिलीय. हे दोघेही स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळं भाजप उमेदवार विनोद तावडे मतदारसंघाबाहेरचं असल्याचा मुद्दा ते उपस्थित करतायत.
शिवसेनेनं याठिकाणी कुणालाही परिचित नसलेल्या उत्तम अग्रवाल या अमराठी व्यक्तीला उमेदवारी दिलीय.
भाजप नेते विनोद तावडेंनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून बोरीवलीची निवड केली असली तरी स्थानिक नसल्याचा फटका त्यांना काही प्रमाणात बसू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.