गडचिरोलीत नक्षवाद्यांनी केला मतदान केंद्रावर गोळीबार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एका मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला जवानांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. दरम्यान, गडचिरोलीतल्या मतदानाची वेळ दुपारी तीन वाजताच संपुष्टात आलीय. 

Updated: Oct 15, 2014, 05:11 PM IST
गडचिरोलीत नक्षवाद्यांनी केला मतदान केंद्रावर गोळीबार title=

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एका मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला जवानांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. दरम्यान, गडचिरोलीतल्या मतदानाची वेळ दुपारी तीन वाजताच संपुष्टात आलीय. 

ताडपल्ली इथल्या एका शाळेत मतदान सुरु असतानाच हा गोळीबार करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे, नक्षलवाद्यांच्या मतदान न करण्याच्या धमक्यांना भीक न घालता इथले नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडले होते. सकाळपासून गडचिरोलीत मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या...  

मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही दुपारी दुपारी सुमारे १२.०० वाजल्याच्या सुमारास नक्षलवाद्यांकडून लक्ष्य एक मतदान केंद्र गोळीबारासाठी लक्ष्य बनवण्यात आलं. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनीही गोळीबार केला. त्यानंतर बराच वेळ पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक सुरू होती. 
 
सुदैवानं या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण, यामुळे थोड्या वेळ मतदान खोळंबलं होतं. 

महत्त्वाचं म्हणजे, नक्षलवाद्यांच्या भीतीनं गडचिरोलीतल्या तीन विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सकाळी ७ ते  दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली होती. तीन वाजता इथलं मतदान बंद करण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.