तुम्हाला राजकारण्यांच्या नावानं शिमगा करायचा हक्क नाही - सलमान

महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 38.33 टक्के तर मुंबईत फक्त 41 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामान्य नागरिक अजूनही घरा बाहेर पडलेला नाही. पण मुंबईत अभिनेते आणि कलाकारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती लावत मतदारांना आवाहन केलं. 

Updated: Oct 15, 2014, 04:47 PM IST
तुम्हाला राजकारण्यांच्या नावानं शिमगा करायचा हक्क नाही - सलमान   title=

मुंबई: महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 38.33 टक्के तर मुंबईत फक्त 41 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामान्य नागरिक अजूनही घरा बाहेर पडलेला नाही. पण मुंबईत अभिनेते आणि कलाकारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती लावत मतदारांना आवाहन केलं. 

मात्र सेलिब्रिटींच्या आवाहनाकडे मतदारांनी साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळं अशा नागरिकांवर दबंग सलमान खान भडकला आहे. 'जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सरकार मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करतं. पण मतदानासाठी मिळालेल्या सुट्टीत लोकं घरी बसून मजामस्ती करताहेत. काही लोकं तर आज पिकनिकला साजरी करत आहेत आणि हेच लोकं नंतर सर्वात पहिले राजकारण्याच्या नावानं शिमगा करतील आणि टीका करत फिरतील', असा टोला अभिनेता सलमान खाननं मतदान न करणाऱ्यांना लगावला आहे.
 
पण अजूनही वेळ गेली नसल्याचं सांगत सल्लूमियाँनं सर्वांना मतदानाचं विनम्र आवाहन केलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.