आचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...

एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत. 

Updated: Oct 13, 2014, 11:27 AM IST
आचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...   title=

औरंगाबाद : एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत. 

‘वोट दो और नोट भी दो’ अशा प्रचाराचं चित्र आहे औरंगाबादच्या गंगापूर मतदारसंघातलं... इथले भाकपचे उमेदवार राम बाहेती हे मतदारांकडूनच मदत घेऊन आपला प्रचार करत आहेत. कोणाकडून आर्थिक तर कोणाकडून धान्याची मदत घेऊन बाहेती आपला प्रचार पुढे घेऊन जात आहेत. मिळणाऱ्या धान्यातून कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय केली जाते तर मिळणाऱ्या पैशातून गाड्यांची सोय केली जाते. 

या मतदारसंघात शिवसेना भाजपचेही तगडे उमेदवार मैदानात आहेत. पण बाहेतींच्या अशा प्रचारामुळे त्यांचं नाव प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.