मुंबई: माहिम मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मनसे आणि शिवसेना दोन्ही उमेदवारांमध्ये याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मनसेनं पुन्हा एकदा नितिन सरदेसाई यांना संधी दिलीय. तर शिवसेनेनं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलंय.
भाजपकडून विलास आंबेकर, काँग्रेसकडून प्रवीण नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम परब यांना उमेदवारी मिळालीय. सर्वच उमेदवार घरोघरी जावून मतदाराराजाला मतदान करण्याची विनंती करतायेत आणि आजपर्यंत मतदारांसाठी काय केलं, याचा पाठा वाचण्याचा कार्यक्रमही केला जातोय.
माहीम मतदारसंघात दादरचाही महत्वाचा भाग येतो. शिवाजी पार्क, शिवाजी मंदिर, शिवसेना भवन हा सर्व परिसर याच मतदारसंघात येतो. त्यामुळं मराठी भाषक मतदार जास्त आहेत तर माहीम परिसरात कोळी बांधवही आहेत. त्यामुळं आता मराठी माणूस आपला कौल कोणत्या पक्षाला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.