मुंबई : शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवण्यासाठी, आपल्याला राज्यातील एका काँग्रेस नेत्याचा फोन आला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मिळून आकडा १४६ पर्यंत येतो, हे काठावरचं बहुमत असल्याने सरकार व्यवस्थित चालेल याची खात्री देता येत नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच हा प्रस्ताव काँग्रेसच्या राज्यातील नेता होता, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून याला कोणताही दुजोरा मिळाला नाही, एकंदरीत राज्यात राष्ट्रपती लागवट कायम राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.