नागपूर : महाराष्ट्र अखंड राहणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोंडाईचाच्या सभेत म्हटलं, म्हणजेच स्वतंत्र विदर्भ होणार नाही, यामुळे विदर्भाचा अपमान झाला, असं काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी म्हटलंय.
तर दुसरीकडे मात्र गडकरी आणि फडणवीस हे विदर्भाच्या जनतेला वेगळ्या विदर्भ होणार असल्याचं सांगतात, मोदी आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यात परस्परविरोधीपणा असल्याने, त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे.
तसेच नितिन गडकरी आणि फडणवीस यांनी पक्षातील पदांचा राजीनामा द्यावा,अशी मागणीही त्यांनी केलीय. कारण स्थानिक नेते वेगळा विदर्भ होईल असं म्हणतात, आणि यांचे राष्ट्रीय नेते होणार नसल्याचं संकेत देतात, ही विदर्भातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप, मुत्तेमवार यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी अस्पष्टपणे विदर्भ होणार नाही असं म्हटलंय, तसेच महाराष्ट्र अखंड ठेवणार असल्याचं जाहीर सभेत सांगून, विदर्भाचा अपमान केला, असल्याचं मुत्तेमवारांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.