ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं. 

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - राहुल कलाटे
भाजप - लक्ष्मण जगताप
काँग्रेस - कैलास कदम
राष्ट्रवादी - नाना काटे
मनसे - अनंत कोऱ्हाळे
अपक्ष - मोरेश्वर भोंडवे

पिंपरी चिंचवड शहरचा खऱ्या अर्थान प्रतिनिधित्व करणारा हा विधानसभा मतदारसंघ... वेगानं विकसित होणारा भाग, उड्डाण पुलांच्या जाळ्यासह कोट्यावधींची विकासकाम सुरू… त्याचबरोबर अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न या सगळ्यामुळे हा मतदासंघ गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. पण ही जशी भौगोलिक ओळख त्याहीपेक्षा या मतदार संघाची ओळख राजकीय उलथा पालथी मूळं अधिक आहेत.

२००९ च्या निवडणूकीचा विचार करता हा मतदार संघ जागा वाटपात काँग्रेसकड गेला. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसन लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी सगळी कुमक लावली आणि शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांना पराभूत करत लक्ष्मण जगताप आमदार झाले. लक्ष्मण जगताप यांना ७८ हजार ७४१ मते मिळाली होती. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना ७२ हजार १६६ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या भाऊसाहेब भोईर यांना २४ हजार ६८४ मते मिळाली होती. या निवडणूकीत जगताप यांना ६, ५७५ चे मताधिक्य मिळालं होतं. 

तब्बल ४ लाख ८३ हजार मतदारांची नोंद झालेला पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदार संघ... विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीत सर्व समीकरणं बदलली आहेत. आमदार जगतापांनी अजीतदादांची साथ सोडत शेकापचा हाथ धरला आणि शिवसेनेचे बारणे हे खासदारही झाले. यावेळी या मतदारसंघावर इच्छुकांचा भरणा वाढल्याचं चित्र दिसलं.    

एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना चिंचवड मतदार संघाच्या समस्या मात्र कायम आहेत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कारकिर्दीत अनेक विकास काम या भागात झाली खरी, पण अनधिकृत बांधकामाचा मुख्य मुद्दा मात्र अजून ही सुटलेला नाही. केवळ चिंचवड मध्ये अनधिकृत बांधकामाचा आकडा ४० हजार घरांपर्यंत जातोय. हा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते भाऊसाहेब जगताप यांनी राजीनामा देणं, बंडखोरी करण असे अनेक पवित्रे घेतले पण हा प्रश्न सुटलेला नाही. 

एकीकडं इच्छुकांची भाऊ गर्दी वाढत असताना चिंचवडचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवार यांनी मात्र अजून आपले पत्ते खोललेले नाहीत. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या दादांना बालेकिल्यात पराभव नको आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.