ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नाशिक पश्चिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 12:48 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - मुक्ताईनगर
ऑडिट जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरचं. म्हणजे अर्थातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघाचं.
Oct 7, 2014, 08:51 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव शहर
जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणूका मात्र जिंकल्यात. जैन यांच्या यशाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे? आगामी निवडणुकीत जैन यांना कुणाचं आव्हान असणारे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणा-या जैन यांची जनतेशी नाळ राहिलीय की तुटलीयं?
Oct 7, 2014, 08:47 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव ग्रामीण
घरकुल घोटाळाप्रकरणी जळगावचे राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर जळगाव ग्रामीण या त्यांच्या मतदार संघात त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी मतदार संघाची धुरा हाती घेतली आहे.
Oct 7, 2014, 08:44 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गंगाखेड
विस्थापितांना आव्हान देत सिताराम घनदाट यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यशाचा गंगाखेड पॅटर्न...काय असतो याचा चमत्कार आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेडमध्ये दाखवून दिलाय. चार दिवसांपूर्वी मतदारांना लुभावण्यासाठी पैसे वाटण्याच्या आरोपाखाली घटनाट यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला.
Oct 7, 2014, 08:36 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसमत
शिवसेनेच्या एकेकाळच्या या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रवादीने कब्जा मिळवलाय. मात्र या मतदारसंघात जनता कुणाच्या बाजूने ऐनवेळी कौल देते हे सांगणं तसं कठीणच.
Oct 7, 2014, 08:27 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आष्टी
आता ऑडिट बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचं. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या सुरेश धस यांचा हा मतदारसंघ.
Oct 7, 2014, 07:23 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बीड
बीड विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सुनील धांडेंचा पराभव केला होता. राजकीय समीकरणांबरोबरच जातीची समीकरणं इथे नेहमीच प्रभावी ठरतात.
Oct 7, 2014, 07:16 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी
परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.
Oct 7, 2014, 07:12 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोरीवली
2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस, अशी त्रिशंकू लढत रंगली होती.
Oct 7, 2014, 05:21 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गोरेगाव
आरे कॉलनी आणि फिल्मसिटीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं मुबईतील गोरेगाव, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातलीगोरेगांव विधानसभा मतदार संघ हा शिवसेनचा बालेकिल्ला आहे.
Oct 7, 2014, 05:14 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घाटकोपर पश्चिम
गेल्या वेळी राम कदम विरुद्ध पूनम महाजन असा सामना रंगला होता. पूनम महाजन आता खासदार झाल्यात. तर राम कदम यांनी भाजपमध्ये उडी घेतलीय.
Oct 7, 2014, 05:07 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया....
Oct 7, 2014, 05:01 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं.
Oct 7, 2014, 04:55 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर
पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय.
Oct 7, 2014, 04:41 PM IST