ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर उत्तर

राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ... काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट.

Updated: Oct 8, 2014, 05:43 PM IST
 title=

नागपूर : राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ... काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
भाजप - मिलिंद माने
काँग्रेस - नितीन राऊत
राष्ट्रवादी - विशाल खांडेकर
मनसे - रितेश मेश्राम
अपक्ष - किशोर गजभिये (बसप)

नागपूर लोकसभा मतदार संघातील एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ. अनुसूचित जातीसाठी हा मतदार संघ राखीव आहे.

या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या लाक्षणीय असली रिपब्लिकन पक्षाला इथं फारसा प्रभाव टाकता आला नाही. मात्र, काँग्रेसचा गड अशीच या मतदार संघाची ओळख राहिली आहे. 

दलित समजाव्यतिरिक्त पंजाबी आणि सिंधी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी असून या विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५३ हजार मतदार आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना आणि जल संधारण मंत्री नितीन राऊत हे या सध्या मतदार संघाचे आमदार आहेत. 

गेल्या निवडणुकीत राउत यांनी भाजपचे राजेश तांबे यांचा १७,८५२ मतांनी पराभव केला होता. गेली ३ टर्म राऊत येथून निवडून येत आहेत. या विधानसभा मतदारसंघात 
- डॉ. आंबेडकर नॉलेज पार्क 
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय 
- राष्ट्रीय महामार्गाचा विकास 
- पिण्याच्या पाण्याची योजना 
- डॉ आंबेडकर रुग्णालय उभारले 
ही विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमादार आणि मंत्री नितीन राऊत यांनी केलाय.

नितिन राऊत यांच्या या विकास कामांच्या दाव्याला विरोधकांनी आक्षेप घेतलाय. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राज्याचे मंत्री करत असले तरी काही प्रमुख समस्या कायम आहेत.
- रस्त्यांची कामे रखली 
- डॉ. आंबेडकर रुग्णालयात सुविधांचा अभाव
- झोपडपट्टीत सोयीसुविधांचा अभाव 
- SRA योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी नाही 

नुकत्याच झालेल्या लोक सभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला १८,५४० मतांची आघाडी मिळाली होती. तसेच कॉंग्रेस अंतर्गत राऊत यांच्या विरोधात असंतोष खदखदतोय त्यामुळे नितीन राऊत यांना ही निवडणूक सोपी नाही. 

हा मतदार संघ महायुतीच्या जागा-वाटपाच्या समीकरणाप्रमाणे जरी भाजपच्या कोट्यात असले तरीही महायुतीतील एक घटक आठवले गटकडून या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१९९९ पासून झालेल्या सलग ३ विधानसभा निवडणुकीत नितीन राउत यांनी विजयाची हेट्ट्रीक साधली असली तरी यावेळी या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी काही चमत्कार घडवणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.