नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरातला दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ... देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केलाय. तर विरोधकांचा त्यांच्या या दाव्यांवर आक्षेप आहे.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - पंजू तोतवानी
भाजप - देवेंद्र फडणवीस
काँग्रेस - प्रफुल्ल गुडदे-पाटील
राष्ट्रवादी - दिलीप पणकुले
अपक्ष - राजेंद्र पडोळे (बसप)
नागपूरमधील सर्वात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ... लाखो बौध्दधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेली दीक्षाभूमी तसेच मिहान प्रकल्प याच विधानसभा मतदारसंघात आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.
३ लाख ४० हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा २७ हजार ७७५ मतांनी पराभव केला होता.
झोपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे, मनीषनगर उड्डाण पूलाचा प्रस्ताव, मिहान प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, अविकसित आणि अनारक्षित ले-आउट्समध्ये विकासाची कामे, रिंग रेल्वे आरक्षण प्रकरणी रहिवाशांना दिलासा, अशी विविध प्रमुख विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केलाय.
विरोधकांना मात्र हा दावा मान्य नाही. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात काही प्रमुख समस्या आजही कायम आहेत.
- अनारक्षित ले-आउट्सचा विकास आणि त्याचे हस्तांतरण
- मिहान प्रकल्पाचा रखडलेला विकास
- मिहान प्रकल्पग्रस्तांकरता वाढीव मोबदला आणि पुनर्वसन
- मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूलाचे काम
- झोपडपट्टीतील रहिवाश्यांना पट्टे वाटप
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पहाता या विधानसभा मतदारसंघातून भाजपला ६२ हजार ७२३ मतांची आघाडी या मतदार संघात मिळाली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी अगोदरपासूनच निश्चित होती. मात्र काँग्रेसकडून नगरसेवक प्रफुल गुडधे-पाटील यांच्या नावाला पसंती मिळालीय.
राज्याचे भावी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडं बघितलं जातं. त्यामुळे या मतदार संघाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.