ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सांगोला

सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास वर्षांपासून गणपतराव देशमुख नेतृत्व करताहेत. जनता त्यांच्यावर कायम विश्वास ठेवतेय. 

Updated: Oct 8, 2014, 12:55 PM IST
 title=

सोलापूर : सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास वर्षांपासून गणपतराव देशमुख नेतृत्व करताहेत. जनता त्यांच्यावर कायम विश्वास ठेवतेय. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - शहाजी पाटील
भाजप - श्रीकांत देशमुख
काँग्रेस - जगदीश बाबर
अपक्ष - गणपतराव देशमुख (शेकाप)                
       *    

सांगोला विधानसभा मतदारसंघ.. सततचा दुष्काळ आणि त्याचमुळे राजकारणी मंडळींकडूनही याच मुद्यावर प्रत्येक निवडणूक खेळली जाते. सांगोला मतदार संघ हा सोलापूर सांगली आणि सातारा या जिह्याच्या सीमावर्ती भागात आहे. सोलापूर शिवाय  या तालुक्याला सांगलीची बाजारपेठही आहे. अडीच लाख मतदार असलेला हा मतदार संघ मात्र सतत दुष्काळाच्या छायेत असतो. 

गेल्या साठ  वर्षापासून शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पन्नास वर्षापासून गणपतराव देशमुख इथे नेतृत्व करताहेत. असं म्हणतात शरद पवार यांच्याशी घनिष्ठ मैत्री असल्याने तसंच संयमी नेतृत्व असल्याने त्यांच्या यशाची हीच गुपितं झालीयेत.  

मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्रित मुठ बांधली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला या मतदारसंघातून सुमारे 14 हजारांची आघाडी मिळालीये. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. 

मात्र, असं जरी असलं तरी...  
- महिलांसाठी स्वतंत्र महिला सूतगिरणी 
- शिक्षण संस्था 
- युवकांना रोजगार 
- टेंभू सिचन योजनेतून संगोल्यासाठी पाणी 
- म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी 

अशा कामांमुळे विजय आपलाच आहे असा आत्मविश्वास गणपतराव देशमुख बोलून दाखवतात... विरोधक गणपतराव देशमुखांवर थेट हल्ला न करता 51 वर्षे राजकारणात राहिल्यानंतर आता तरुणांना संधी देणार की नाही, असा सवाल निर्माण करत टीकास्त्र सोडताहेत. 

एकूणच मतदारसंघात गणपतराव देशमुख यांची एकहाती सत्ता वर्षानुवर्ष असली तरी अनेक समस्या आहे तशाच आहेत. 
- युवकांना रोजगार नाही
- खड्डेमय रस्ते
- अपुरा पाणीपुरवठा
- अपुरी शिक्षणव्यवस्था
- तरुणांना नोकऱ्या नाहीत

अशा समस्यांमुळे गणपतराव देशमुख यांच्याविषयी नाराजी ही आहेच. या नाराजीला आणि लोकसभेत मोदी लाटेत मतदारांचा महायुतीकडे वळालेला वाढता ओढा या गोष्टी आगामी निवडणुकीत चिंतेच्या ठरू शकतात. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.