शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, १०० टाके

 भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Updated: Jun 27, 2014, 03:50 PM IST
शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, १०० टाके title=

मुंब्रा, ठाणे : भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय.

या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंब्र्यातील अमृत नगर परिसरात राहणारा शाहीद नसीम सय्यद हा तिसरीत शिकणारा नऊ वर्षाचा मुलगा दोन भावांबरोबर शाळेत जात होता.

यावेळी या परिसरात असणा-या आठ ते नऊ भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरून त्याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ प्रथम कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पण डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र तिथेही योग्य उपचार उपलब्ध नसल्याने कुटुंबियांनी त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविले.

तिथे त्याच्यावर बुधवारी रात्री उशिरा प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.