एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा ती प्रियकरासोबत पळाली

प्रेम आंधळे असते हे अहमदाबादमधील या घटनेवरुन तुम्हालाही पटेल. मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून एक युवती एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रियकरासोबत पळाली.

Updated: Jul 29, 2016, 01:25 PM IST
एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा ती प्रियकरासोबत पळाली title=

अकोला : प्रेम आंधळे असते हे अहमदाबादमधील या घटनेवरुन तुम्हालाही पटेल. मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून एक युवती एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रियकरासोबत पळाली.

या तरुणीचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. तिच्या घरच्यांना ही गोष्ट समजल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचे अहमदाबादमधील एका युवकाशी लग्न लावून दिले. मात्र मनाविरुद्ध लग्न झाले ती तरुणी नाराज होती.

लग्नानंतरही ती तरुणी आपल्या प्रियकराला भेटत होती. प्रेमापोटी तिने घरही सोडले मात्र घरच्यांनी तिला शोधून आणले. पहिला प्रयत्न फसला म्हणून ती दुसऱ्यांदा प्रियकरासोबत पळून गेली. मात्र महिन्याभरानंतर तिला पुन्हा शोधून आणले.

दोनवेळा प्रयत्न निष्फळ ठरल्याने ही युवती तिसऱ्यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पळून गेली. यावेळी तिला परत आणण्याचा प्रयत्न तिच्या घरच्यांनी केला मात्र तिने तातडीने या प्रकऱणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी दोन्ही कुटुंबे पोलीस स्थानकात होती. पोलीस ठाण्यातच दोन्ही कुटुंबातील महिलांची हाणामारीही झाली.