पुणे : पुण्याचं वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा आज 285 वा वर्धापन दिन आहे. हे औचित्य साधत शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा दोन तासांसाठी खुला करण्यात आला होता. या निमित्ताने अठराव्या शतकातल्या या दिमाखदार वास्तूची भव्यता पुणेकर आणि पर्यटकांना अनुभवता आली.
या आधी शनिवारवाड्याचा हा भव्य दरवाजा फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशीच उघडण्यात येत असे. मात्र पुरातत्व विभागानं परवानगी दिल्यानंतर, गेल्या वर्षापासून 22 जानेवारी या वर्धापन दिनीही दिल्ली दरवाजा खुला करण्यात येतो.