एका मतदारसंघात आढळले ४० हजार बोगस मतदार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जवळपास 40 हजार बोगस मतदार आढळून आले आहेत.. एकाच मतदारांची नावं औरंगाबादेतील काही मतदारसंघात आणि सिल्लोड मतदारसंघात आढळून आली आहे.. मतदारयादीतील हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय.. तर निवडणूक विभागानही याची गांभिर्याने दखल घेतली आहे..

Updated: Sep 12, 2014, 01:15 PM IST
एका मतदारसंघात आढळले ४० हजार बोगस मतदार title=

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जवळपास 40 हजार बोगस मतदार आढळून आले आहेत.. एकाच मतदारांची नावं औरंगाबादेतील काही मतदारसंघात आणि सिल्लोड मतदारसंघात आढळून आली आहे.. मतदारयादीतील हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय.. तर निवडणूक विभागानही याची गांभिर्याने दखल घेतली आहे..

सिल्लोड मतदारसंघात मतदारायादीतील मोठा घोळ समोर आलाय.. सिल्लोड विधानसभा मतदार यादीत जवळपास 40 हजार नावं बोगस आढळून आली आहेत. तहसिलदार आणि निवडणूक विभागानं तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत हा घोळ समोऱ आलाय..

या मतदारांची नावं औरंगाबादच्या वेगवेगळ्या मतदारसंघातही आहेत आणि सिल्लोडमध्ये सुद्दा या नावांचा समावेश आहे.. याबाबतची तक्रार सिल्लोडच्या स्थानिक भाजप नेत्यांनी केली होती. या बोगस नावातील बहुतांश नाव मुस्लिम समाजाची असल्याचा आरोप भाजप करतेय, मतदारयादीतील हा घोळ सिल्लोडचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीच केला असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी केला आहे.

औऱंगाबाद जिल्ह्याच्या निवडणूक विभागानंही हे झाल्यांच मान्य केलय.. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 जुलैला अंतिम यादी जाहीर केल्यानंतर आता नावांना वगळणे शक्य नसल्याचं उपजिल्हाधिका-यांच म्हणणं आहे.. मात्र ही सगळी नाव आता एसडी लिस्टमध्ये टाकणार आणि या नावाच्या मतदारांवर प्रशासन कडक लक्ष ठेवणार असल्याचं उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग शशिकांत हदगल यांनी सांगितले आहे.

मतदारयादीत नावांच्या समावेशावरून आता राजकारण सुरु झालय.. भाजप आरोप करीत असलं तरी यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा अब्दुल सत्तार यांनी झी मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलतांना केलाय.. कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच नावं यादीत समाविष्ट करता येतात, आता यातील सत्य शोधण्याचे काम निवडणूक विभागाचे असले तरी ही नाव समाविष्ट होत असताना निवडणूक विभाग नक्की करीत तरी काय होते याचीही चौकशी करण्याची गरज निर्माण झालीये.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.