नाशिकच्या महापौरपदी मनसेेचे अशोक मुर्तडक

नाशिकच्या महापौरपदी मनसेच्या अशोक मुर्तडक यांनी निवड झालीय.

Updated: Sep 12, 2014, 01:13 PM IST
नाशिकच्या महापौरपदी मनसेेचे अशोक मुर्तडक  title=

नाशिक : नाशिकच्या महापौरपदी मनसेच्या अशोक मुर्तडक यांनी निवड झालीय. त्यामुळे, मनसेकडे असलेला एकूलता एक गड मनसेला राखण्यात यश आलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

या निवडणुकीत महायुतीच्या सुधाकर बजगुजर यांचा दारुण पराभव झालाय. सुधाकर बडगुजर यांना 44 मतं मिळालीत. तर अशोक मुर्तडक यांना 75 मतं मिळाली. 
या पराभवामुळे, 'महापालिकेत आपण चमत्कार घडवणार असल्याचा' शिवेसेनेचा दावा फोल ठरलाय.

मनसेच्या शशिकांत जाधव, अशोत मुर्तडक, सुदाम कोंबडे, सलीम शेख या चौघांनी अर्ज दाखल केले होते... मात्र, राज ठाकरे यांनी मुर्तडक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.  

नवे महापौर अशोक मुर्तडक हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. पोलीस दलातील २० वर्षांच्या सेवेनंतर मुर्तडक राजकारणात सक्रीय झाले असून त्यांना दोनदा नगरसेवक होण्याचा मान मिळाला आहे. 

 

 
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.