जळगाव : उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जळगाव आणि भुसावळ इथं ४८ डिग्री अंशापर्यंत तापमान पोहोचलंय. ह्या वर्षाची सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय.
गेल्या आठवडाभर वातावरणातल्या बदलामुळे कमी झालेला उष्मा मे च्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा चांगलाच वाढलाय. जळगावसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पारा आज ४६ ते ४८ अंशावर पोहचला. अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांना दुपारी बाहेर पडणं जिकरीचं झालंय.
उन्हाचा फटका बसत असल्यानं नागरिकांना बाहेर पडताना पांढरे रुमाल, टोप्यांचा तसंच थंड पेयांचा सहारा नागरिकांना घ्यावा लागतोय.