४ जी वायफाय सेवा देणारी इस्लामपूर देशातील पहिली नगरपालिका

 फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजीमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आल आहे.अभिनेत्री सई ताम्हणकरची या  सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सईने फोर जी वायफायचे फायदे सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करा असे आवाहन, उपस्थित प्रेक्षकाना केले.

Updated: Sep 8, 2015, 11:19 AM IST
४ जी वायफाय सेवा देणारी इस्लामपूर देशातील पहिली नगरपालिका title=

इस्लामपूर :  फोर जी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजीमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आल आहे.अभिनेत्री सई ताम्हणकरची या  सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सईने फोर जी वायफायचे फायदे सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करा असे आवाहन, उपस्थित प्रेक्षकाना केले.

सांगली  जिल्ह्यातील इस्लामपूर हे दीड लाख लोकवस्तीचे शहर. या शहराला नवी ओळख मिळालीय. इस्लामपूर हे देशातलं पहिलं ४ जी वायफाय शहर बनंलयं.  रिलायन्स जिओच्या मदतीनं इस्लामपूर नगरपालिकेने नागरिकांसाठी फोर जी वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी शहरात १२ ठिकाणी वायफायचे अॅक्सेस पॉईंट्स लावण्यात आलेत.

फोर जी हे जगाशी वेगवान संपर्क ठेवण्याचे मध्यम आहे. तंत्राज्ञानामुळे ज्ञानाचा मोठा सोर्स उपलब्ध होणार आहे. येथील विध्यार्थ्याना त्याचा उपयोग होणार आहे, असे मत माजीमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. रोटी कपडा मकान हि म्हंण, आत्ता रोटी कापड आणि वाय फाय अशी झाली आहे, या नव्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करा असे आवाहन अभिनेत्री सई ताम्हणकरने उपस्थितांना केले.

माहितीच्या महाजालाशी अंत्यंत वेगानं जोडलं जाणाऱ्या या तंत्रज्ञामुळे आता  इस्लामपूरकरांना 
3 जीच्या सात पट वेगानं माहिती डाऊन  लोड करता येईल, लाईव्ह टिव्ही, आणि स्काईप आणि पेरिस्कोप सारख्या सुविधा सहज वापरता येतील, एखादा 3जी फोनवर म्युझिक अल्बन डाऊन लोड करायला साधारण 20 मिनिटं लागतात...हेच काम 4 जी सेवेमुळे फक्त 3 मिनिटात करता येणार आहे.

इस्लामपूरमध्ये सुरु झाल्या या सेवेसाठी तूर्तास कुठलही शुल्क घेण्यात येणार नसल्यानं नागरिकांनामध्ये आनंद व्यक्त होतोय. तूर्तास जरी सेवा मोफत असली तरी भविष्यात त्यासाठी शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.