या तिजोरीत दडले आहेत ८० कोटी रूपये

स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेझरीमध्ये शासकीय व्यवहारांचे पैसे ठेवले जात होते, या ट्रेझरीला मोठं पोलिस संरक्षण होतं. मात्र बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं आणि ट्रेझरीत चलनी नोटा आणि नाणी ठेवणं बंद झालं, यात आता फक्त मुद्रांक असतात. अनेक ठिकाणी ट्रेझरीतील तिजोऱ्या धुळ खात पडल्या आहेत.

Updated: Dec 13, 2015, 09:18 PM IST
या तिजोरीत दडले आहेत ८० कोटी रूपये title=

सांगली : स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेझरीमध्ये शासकीय व्यवहारांचे पैसे ठेवले जात होते, या ट्रेझरीला मोठं पोलिस संरक्षण होतं. मात्र बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं आणि ट्रेझरीत चलनी नोटा आणि नाणी ठेवणं बंद झालं, यात आता फक्त मुद्रांक असतात. अनेक ठिकाणी ट्रेझरीतील तिजोऱ्या धुळ खात पडल्या आहेत.

सर्व राज्याचा विचार केला, तर या तिजोऱ्यांना म्हणजेच ट्रेझरीला १ हजारापेक्षा जास्त पोलिसांचं संरक्षण आहे, यासाठी शासनाचा ८० कोटींचा खर्च होतो. ही माहिती सांगलीतील माहिती कार्यकर्ते लक्ष्मणराव निकम यांनी ही माहिती काढली आहे.

हा पहारा हवा तेथे वापरण्यात आला तर नको तो पहारा बंद करता येणार आहे, यामुळे शासनाचा मोठा खर्च वाचेल आणि योग्य त्या ठिकाणी पहारा देता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.