एसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा

गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Updated: Sep 3, 2014, 02:23 PM IST
एसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा title=

मुंबई : गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेने याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर्पयतच्या आकडेवारीनुसार, शताब्दी ट्रेन 4,635 तिकिटे, एसी डबल डेकरची 8,640 तिकिटे, एसी आरक्षित ट्रेनची 1,330 तिकिटे उपलब्ध आहेत. कमी प्रतिसाद मिळत असल्याने या तिन्ही ट्रेनच्या फेऱ्या मागे घेण्यात येतील, असे यामध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी-एलटीटी विशेष ट्रेन सोडण्यात आली. मात्र या ट्रेनला येताना केवळ 125 प्रवासी, तर जाताना केवळ 282 प्रवासी मिळाले. कमी प्रतिसादामुळे 1 सप्टेंबरपासून ही ट्रेन बंद करण्यात येणार आहे, असे कोकण रेल्वेच्या माहिती जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.