प्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...

कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.

Updated: Sep 3, 2014, 12:49 PM IST
प्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा... title=

मुंबई : कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.

एसी गाड्यांना चाकरमान्यांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यानं कोंकण रेल्वेनं असा पवित्रा घेतलाय. कमी प्रतिसाद मिळत असलेल्या गाड्या चालवण्याचे कोकण रेल्वेला ओझं झालंय. 

आधीच नेहमीच्या गाड्यांसोबत गणपती स्पेशल गाड्या चालवण्याची कसरत कोंकण रेल्वेला करावी लागतीय. अशा वेळी अल्प प्रतिसाद मिळत असेल तर या गाड्या बंद करण्यात येतील, अशी एकप्रकारे धमकीच कोंकण रेल्वेनं प्रवाशांना दिलीय.

एक नजर टाकुयात, 22 ऑगस्ट 2014 ते 1 सप्टेंबर 2014 दरम्यान विशेष गाड्यांच्या झालेल्या बुकिंगवर...

एक्स्प्रेस गाड्या उपलब्ध सीट झालेलं आरक्षण बुकिंगची टक्केवारी
बुकिंगची टक्केवारी 4635 1124 24.25%
डबल डेकर एसी(02005/6) 8640 1640 18.98%
एसी रिझर्व्ह स्पेशल(02045/6) 1330 339 25.48%

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.