एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. तीन कार एकमेकांना धडकल्या.

Updated: Jun 12, 2016, 04:39 PM IST
एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात title=

पुणे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. तीन कार एकमेकांना धडकल्या. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 1 जण ठार, तर 11 जखमी झालेत. या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

याआधी 5 जूनला एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 7 महिला, 4 पुरुष आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता, तर 25 जण जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा झालेल्या अपघातामुळे एक्स्प्रेस हायवेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.