पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला

पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात प्रवासी गंभीर जखमी झालेत. मनमाड-दौंड दरम्यान ही घटना घडली आहे.

Updated: Apr 3, 2017, 08:26 PM IST
पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला title=

मनमाड : पुणे-सतना एक्स्प्रेसमध्ये अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात प्रवासी गंभीर जखमी झालेत. मनमाड-दौंड दरम्यान ही घटना घडली आहे.

हल्लेखोर चोरीच्या उद्देशानं ट्रेनमध्ये चढले होते. यावेळी प्रवाशांनी विरोध केल्यामुळे त्यांनी अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.