नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आडत वसूल करण्याला राज्यातील शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध केलाय.
आडत्या हा शेतकऱ्याला कोणतीच सेवा देत नसल्याने शेतकऱ्याकडून आडत वसूल करण्याचा प्रश्नच नाही असा मुद्दा शेतकरी संघटनेनं मांडलाय. तर पूर्वीच्याच पद्धतीने शेतकऱ्यांकडूनच आडत घेण्यात यावी यासाठी बाजार समितीतले व्यापारी प्रतिनिधी ठाम आहेत.
त्यामुळे आडतीच्या मुद्यावर राज्य सरकारने नेमलेल्या विशेष समितीची दुसरी बैठकही मतभेदातच संपली. बाजार समित्यांमध्ये सध्या केवळ २० टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडून येतो. उर्वरीत ८० टक्के शेतमाल हा व्यापारी थेट खरेदी करुन आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आडतमुक्त करुन व्यापाऱ्यांच्या मालावर हवेतर आडत आकारण्यात यावी, अशीही मागणी काही शेतकरी प्रतिनिधींनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.