राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा, शेतकऱ्यांशी चर्चा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुंजी, शहापूर येथील भागाचा दौरा केला. मात्र, शेतकऱ्यांनी ठोस आश्वासन मिळालेले नाही.

Updated: Apr 30, 2015, 02:13 PM IST
राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा, शेतकऱ्यांशी चर्चा title=

गुंजी, शहापूर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुंजी, शहापूर येथील भागाचा दौरा केला. मात्र, शेतकऱ्यांनी ठोस आश्वासन मिळालेले नाही.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अमरावती जिल्ह्यातली पदयात्रा सुरू झाली. धामणगाव तालुक्यातल्या गुंजी इथून त्यांनी आपली ही यात्रा सुरू केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.गुंजीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. 

तिथून ते शहापूरकडे रवाना झाले. शाहपूरमधल्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधींनी पुढे मार्गक्रमणा केली. तत्पूर्वी कोंडाळी, काठीया धाबा, तळेगावमध्ये काँग्रेस काँग्रेसच्या युवराजांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. राहुल यांच्या या भेटीमुळे विदर्भातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय आणि बळीराजालाही या भेटीतून काही भरीव हाती लागण्याची आशा आहे.

राहुल गांधींनी शहापूर येथील किशोर कांबळे या शेतक-यांच्या घरी भेट दिली. कांबळे परिवाराशी चर्चा केली आणि त्यांना सरकारकडून मदती मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान, राहुल यांनी २००५ मध्ये विदर्भातल्या कलावती यांची भेट घेतली होती. शेतकरी असलेल्या कलावती यांच्या पतीनं आत्महत्या केली होती. दरम्यान आता राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे १० वर्षांनंतर पुन्हा राहुल कलावती यांना भेटणार का, याबाबत कुतुहल आहे. 

शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी विदर्भात यात्रा करणार असून, हा कुठल्या नेत्याचा विषय नसून सर्वसामान्य जनेतेचा विषय असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. राहुल गांधी यांचं आंदोलन हे जनआंदोलन असल्याचा दावाही त्यांनी केला. 

काँग्रेसच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या असल्या तरी तेव्हाच्या सराकराने सत्तर हजार कोटींची  कर्जमाफी करून दिल्याची आठवणही चव्हाणांनी या निमित्तानं करून दिली. दरम्यान राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप, नारायण राणे यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता अशोक चव्हाणांनी सारवासारव केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.