"शहरातील नोकरदारांना विशेष 'शेती कर' लावा"

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांना कर लावण्याची मागणी करणाऱ्यांसाठी ही एक चपराक असल्याचं मानलं जात आहे, कारण शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज असल्याचं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

Updated: Apr 6, 2015, 09:30 PM IST
"शहरातील नोकरदारांना विशेष 'शेती कर' लावा" title=

नाशिक : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांना कर लावण्याची मागणी करणाऱ्यांसाठी ही एक चपराक असल्याचं मानलं जात आहे, कारण शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज असल्याचं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

शेती कर विषयी बोलतांना भालचंद्र नेमाडे म्हणाले, मातीतील माणसांचा क्वचितच गौरव होतो. त्यापेक्षा शहरी वृत्तीकडे अधिक लक्ष दिले जाते. खरे तर शेती हा सर्वश्रेष्ठ व्यवसाय आहे. शहरी नोकरदार ठरावीक तासांपुरते काम करतात, परंतु शेतात संपूर्ण कुटुंबास चोवीस तास काम करावे लागते. त्यामुळेच शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज त्यांनी मांडली.अफूवर ज्याप्रमाणे बंदी आणली गेली.

इंग्रजी भाषेच्या शाळांवर बंदी आणली पाहिजे - नेमाडे
इंग्रजी भाषेच्या शाळांवर बंदी आणली पाहिजे, अशी रोखठोक मागणी देखिल भालचंद्र नेमाडे यांनी येथे केलीय. इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास साम, दाम, दंड पद्धतीने विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आनंद अ‍ॅग्रो ग्रुप प्रस्तुत गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास विरोध करताना इंटरनॅशनल शाळांमध्ये मुले काय शिकतात याचा थांगपत्ता लागत नसल्याचा टोमणाही त्यांनी हाणला. प्राकृत भाषा ही मराठीची जननी असून बोली भाषांना महत्त्व देणे आवश्यक आहे. ब्राह्मणी वर्चस्ववादामुळे आपणांमध्ये आपण बोलतो ती मराठी भाषा अशुद्ध आहे की काय, असे वाटते. परंतु तसे काहीही नाही. 

आई लहानपणापासून मुलांना जे शिकविते ते खरे चिरंजीव साहित्य होय, असा आईच्या संस्कारांचा त्यांनी गौरव केला. या वेळी प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रांतील १४ जणांना पुरस्कार देण्यात आले. त्याचा उल्लेख करत हा खरा मातीतील माणसांचा गौरव होय, असे नेमाडे यांनी नमूद केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.