पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीत बऱ्या पैकी भाजप सेनेचे उमेदवार, पण तरीही भाजपने दुसऱ्या पक्षातल्या उमेदवारांना आयात करण्याचा धडाका सुरु केलाय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत केली.
अजित पवार - भाजपने सत्तेसाठी गुंडांना ही पक्षात प्रवेश दिलाय..! भाजप गुंडांचा पक्ष झालाय...!
अजित पवार - आझम पानसरे यांच्यावर कोणताही अन्याय केलेला नाही...! तरीही त्यांनी का पक्ष सोडला हे त्यांनाच माहीत ,पराभव झाला असताना ही त्यांना स्वीकृत सदस्य केले त्यांच्यावर अन्याय झाला नाही ,पक्षाने त्यांना खासदारकीच, आमदारकीच तिकीट ही दिले होते.
अजित पवार - नगरसेवकांच्या जोरावर पालिकेत सत्ता आणू हा विश्वास आहे.
अजित पवार - कोणी आरे करत असेल तर आम्ही कारे करायची हिम्मत आमच्यात आहे, अजित पवार यांचा भाजपला इशारा...!
अजित पवार - महापालिका निवडणुकीत काँग्रेस बरोबरआघाडी करण्यासाठी सकारात्मक...मात्र सन्मानजनक प्रस्ताव असावा
अजित पवार - भाजप म्हणजे दोन तोंडी आहे, राष्ट्रवादी वर आरोप करायचे आणि राष्ट्रवादीचेच लोक पक्षात घायचे असं यांचे धोरण
अजित पवार - नोट बंदी हुन 2 महिने झाले तरी जिल्हा बँका, पतसंस्था ना आरबीआयकडून पैसे नाहीत, आरबीआयवर पहिल्यांदाच शंका येते, नोटबंदी हुकूमशाहीचा निर्णय..!
अजित पवार - नोटबंदीमुळे भ्रष्टाचार वाढला आहे...!
अजित पवार - युतीवर आघाडी अवलंबून नाही, आघाडी ही सर्वस्वी वेगळी..!
अजित पवार - राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या महापालिकेत विकास अधिक आहे,