अवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला. 

Updated: Aug 30, 2016, 06:23 PM IST
अवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर title=

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला. 

मृत्यूपश्चात अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी आज शहरात जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या पुढाकारातून ही फेरी काढण्यात आली. शहरातील सात विविध मार्गांवरून ही फेरी काढण्यात आली.

पुणेकर नागरिक, विद्यार्थी तसेच सामाजिक संघटना त्यात मोठ्या सहभागी झाल्या होत्या. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर या फेरीचा समारोप झाला. यावेळी अवयव दानाचे अर्ज भरतानाच मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

तुम्हीही करू शकता अवयवदान

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत अवयवदानाची ऑनलाईन नोंदणीही करता येणं शक्य होणार असून ती www.dmer.org  या संकेतस्थळावर करता येईल.