वाशी : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून संपावर जाणार आहे.. समितीमधील कांदा बटाटा मार्केट या बेमुदत संपामध्ये सहभागी होणार आहे. तर भाजी आणि फक मार्केट मंगळवारपासून या बंदमध्ये सहभागी होतील..
सरकारच्या नियमन मुक्तीचे व्यापारी वर्गानं स्वागत केलंय. मात्र, शासनाने नियमन मुक्ती अर्धवट केली आहे. बाजार समितीमध्ये नियमन आणि बाहेर नियमन नाही हा दुजाभाव का ?
तसंच व्यापारी वर्गाची संपूर्ण नियमन मुक्तीची मागणी असून गुजरातनं ज्या पद्धतीनं नियमन मुक्ती केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रानं करावी यासाठी आजपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंदमध्ये सहभागी होईल..