नितेश राणेंच्या गाडीवर हल्ला, 1 जण जखमी

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला झालाय. कणकवली ते मालवण असा प्रवास करत असतांना तीन गाड्यांवर आठ-दहा जणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात एक जण जखमी झालाय. 

Updated: Jul 15, 2014, 10:55 PM IST
नितेश राणेंच्या गाडीवर हल्ला, 1 जण जखमी title=

ओरोस रानबांबुळी: स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला झालाय. कणकवली ते मालवण असा प्रवास करत असतांना तीन गाड्यांवर आठ-दहा जणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात एक जण जखमी झालाय. 

संतोष सोमा राऊत असं जखमीचं नाव आहे. एकूण तीन गाड्यांच्या ताफ्यात एक जिप्सी आणि एका सुमो गाडीवर हल्ला करण्यात आला. नितेश राणे मालवणला जाणार आहेत याबाबतची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनाच होती, त्यामुळं संशयाची सुई त्यांच्यावरच आहे. 

ओरेस रानबांबुळी हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी नितेश राणेंनी ओरोस पोलीस स्टेशनला तक्रार केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.