औरंगाबाद : राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीवरून बरीच चर्चा रंगलीये... दुचाकीवर हेल्मेट न वापरल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरीही काही लोक विरोध करतात. मात्र अशांसाठी एक जालीम उपाय औरंगाबादच्या एका रँचोनं शोधून काढलाय.
गाडीला सतत किक मारत असतांना बाईक सुरु होत नाही. त्याचे आता कारणही तसेच असणार आहे. कारण हेल्मटसाठी नवा पर्याय उभा राहणार आहे. मात्र आता हेल्मेट घातल्यावर ही बाईक कशी पटकन सुरू होते. औरंगाबादच्या रोहित पाटसकर या विद्यार्थ्यानं ही किमया साधलीय. रोहितनं असं एक सर्किट तयार केलंय त्यात
हेल्मेट डोक्यावर घातलं नाही, तर बाईकचं इंजिन सुरूच होत नाही.
इतकंच नव्हे, तर हेल्मेट काढल्यास बाईकही बंद पडते. वायरलेस हेल्मेट इग्निशन सिस्टिम असं या प्रकल्पाचं नाव आहे. या प्रकल्पासाठी हेल्मेटसह एक हजार रुपये खर्च आलाय. रोहित पाटसकर इंडोजर्मन टुलरूम औरंगाबाद या महाविद्यालयात इंजीनियरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतोय. त्यानं हा प्रकल्प तयार केलाय.
रोहितनं प्रवास करतांना एक अपघात पहिला. मृत व्यक्तीनं हेल्मेट घातलं नव्हतं, त्यामुळे त्याच्या जीव गेला. त्यानं पुढे असा अपघातात कुणाचाही जीव जावू नये म्हणून प्रयोग केलाय. या यंत्रणेमध्ये हेल्मेटच्या वरच्या भागात एक स्विच बसवण्यात आलाय.
हेल्मेट घातलं की स्विच दाबले जाऊन सर्किट पूर्ण होतं. त्यानंतर त्यातून एफएम वेव्हज बॅटरी आणि इग्निशन कॉइलमध्ये बसवलेल्या रिसिव्हरकडे पाठवण्यात येतात. रिसिव्हर ते रिसिव्ह करून त्याचं वीजेत रुपांतर करतो. त्याठिकाणी जोडलेला रिले या लो करंटचे हाय करंटमध्ये रूपांतर करून इग्निशन कॉइल सुरू करतो आणि त्याद्वारे टू व्हिलर सुरू होते.
किक स्टार्ट आणि बटण स्टार्ट या दोन्ही प्रकारच्या बाईकमध्ये ही यंत्रणा वापरता येते. या प्रयोगाचं ओरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील कौतुक केले आहे. जे दुचाकीवर हेल्मेट घातल नाहीत, त्यांना चाप बसविण्यासाठी रोहितच्या या नव्या तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा होणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक करताना म्हटलेय.
दरवर्षी अनेक लोक रस्ते अपघातात प्राणास मुकतात. दुचाकी अपघातांची संख्या तर सगळ्यात जास्त आहे. त्यामुळं हेल्मेट वापरण्याचं नेहमीच आवाहन केलं जातं. तरी सुद्धा नागरिक त्यातून पळवाट काढतातच. मात्र अशा प्रकारे यंत्रणा राबवली तर नक्कीच हेल्मेट वापर वाढेल, आणि लोकांचे जीवही वाचतील.