या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली

मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 7, 2017, 10:45 PM IST
या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली title=

बारामती : जीवनात काही गोष्टी करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते, याची अनुभूती आज बारामती तालुक्यातल्या डोर्लेवाडी गावातील न्यू इंग्लिश स्कूल परिक्षा केंद्रावर आली. 

या परीक्षा केंद्रावर धोतर टोपी, नेहरु शर्ट घतलेले एक गृहस्थ दहावीची परिक्षा देत आहेत. बालवयातच शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलेले बाबासाहेब खारतोडे हे सध्या आपल्या मुलांच्या मार्गदर्शनाखाली दहावीची परीक्षा देत आहेत. बाबासाहेब खारतोडे हे ५१ वर्षाचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

माझं मराठी बोलणं, लिहिणंही चांगलं आहे, त्याचप्रमाणे हिंदी देखील आहे, मात्र मला इंग्रजी शिकायचं आहे, इंग्रजीत किर्तन करण्याचा माझा प्रयत्न आहे, म्हणून मी दहावीची परीक्षा देत असल्याचं बाबासाहेब खारतोडे यांनी म्हटलं आहे.