पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली. स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी श्री बालाजी फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2017, 09:06 PM IST
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड  title=

पुणे : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली. स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी श्री बालाजी फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते. या व्याख्यानासाठी रंगमंदिर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खचाखच भरले होते. त्यामुळे नंतर येणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. अशा परिस्थितीत रंगमंदिराच्या प्रवेशदाराशी मोठा गोंधळ उडाला.

विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वार तसेच नामफलकाची तोडफोड केली. या गोंधळामुळे व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर या गोंधळात झालेलं नुकसान आयोजकांकडून भरून घेणार असल्याचं बालगंधर्व व्यवस्थापकांनी सांगितलं.