भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
गावात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम बघायला ही मुलगी गेली होती. पीडित १७ वर्षांची असून कार्यक्रम संपल्यानंतर ती आपल्या मित्रासोबत बोलत होती. तेव्हा गावातीलच ४ व्यक्ती तिथं आले. त्यांनी मुलाला धमकावून हुसकावलं आणि मुलीचं अपहरण करून तिला शेतात निर्जनस्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला.
त्याच परिस्थितीत पीडित मुलीनं आपलं घर गाठून घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी लगेच आंधळगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच चारही आरोपींना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी कोर्टानं सुनावलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.